MI in Playoff 2023 : मुंबई इंडियन्सने प्लेऑफपर्यंत अशी मारली मजल, कोणते सहा पराभव लागले जिव्हारी; वाचा
आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला आहे. गुजरातने आरसीबीला पराभवाचं पाणी पाजलं आणि मुंबईची प्लेऑफमध्ये वर्णी लागली. चला पाहुयात मुंबईला कोणता संघ पडला भारी
1 / 14
मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला 8 विकेट्स आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo : IPL/BCCI)
2 / 14
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नईने मुंबईला 7 गडी आमि 11 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo : IPL/BCCI)
3 / 14
तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेलं 173 धावांचं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. (Photo : IPL/BCCI)
4 / 14
चौथ्या सामन्यात मुंबई कोलकात्याला पराभूत केलं. कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयासाठई 186 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबईने 5 गडी आणि 14 चेंडू राखून पूर्ण केलं.(Photo : IPL/BCCI)
5 / 14
पाचव्या सामन्यात मुंबईने हैदराबादला पराभूत केलं. मुंबई 193 धावांचं आव्हान हैदराबादला दिलं होतं. मात्र हैदराबादचा संघ सर्वबाद 178 धावाच करू शकला. मुंबई हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. (Photo : IPL/BCCI)
6 / 14
सहाव्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईची गाडी रुळावरून खाली आणली. पंजाबने मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 201 धावा करू शकला. मुंबईचा 13 धावांनी पराभव झाला. (Photo : IPL/BCCI)
7 / 14
सातव्या सामन्यात गुजरातने मुंबईला आस्मान दाखवलं. मुंबईला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ 152 धावा करू शकला. मुंबईचा 55 धावांनी पराभव झाला. (Photo : IPL/BCCI)
8 / 14
आठव्या सामन्यात मुंबई कमबॅक करत राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. राजस्थानने 213 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 6 विकेट्स आणि 3 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)
9 / 14
पंजाबकडून साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवाचा वचपा मुंबईने दुसऱ्या सामन्यात काढला. मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)
10 / 14
साखळी फेरीत चेन्नईचा संघ दुसऱ्यांदा मुंबईवर भारी पडला. चेन्नईने मुंबईला 20 षटकात 139 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेलं 140 धावांचं आव्हान 17.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)
11 / 14
साखळी फेरीत पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला पराभूत केलं होतं. पण मुंबईने दुसऱ्या सामन्यात याची परतफेड केली. आरसीबीने विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)
12 / 14
मुंबई इंडियन्सने गुजरात देखील दुसऱ्या फेरीत चांगलाच इंगा दाखवला. मुंबईने विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. गुजरातचा संघ फक्त 191 धावा करू शकला. मुंबईने हा सामना 27 धावांनी जिंकला.(Photo : IPL/BCCI)
13 / 14
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये भिडणार आहेत. पण साखळी फेरीत लखनऊचा संघ मुंबईवर भारी पडला होता. लखनऊने 177 धावांचं आव्हान मुंबईला दिलं होतं. पण मुंबईचा संघ 5 गडी गमवून 172 धावा करू शकला. (Photo : IPL/BCCI)
14 / 14
मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबाद संघाला दुसऱ्यांदा पराभूत करत दोन गुणांची कमाई केली. यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला. हैदराबादने 201 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 8 गडी आणि 12 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)