IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टेन्शन वाढलं, पंजाब किंग्स विरुद्धचा सामना गमावला तर…
आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाने सुरुवात केली. मात्र त्यानंतर संघाची रुळावरून घसरण होताना दिसत आहे. 14 पैकी प्रत्येक संघाचे पाच सामने झाले आहेत. यात आरसीबीची स्थिती एकदम नाजुक आहे.
1 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेत प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार आहे. त्यापैकी प्रत्येक संघाने 5 सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स चार विजयांसह या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर आरसीबीचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
2 / 6
आयपीएल कारकिर्दीत आरसीबीने अद्यापर्यंत एकही जेतेपद पटकावलेलं नाही. दुसरीकडे, स्पर्धेत फक्त दोन सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
3 / 6
आरसीबीने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना जिंकला आहे. तर केकेआर, लखनऊ सुपर जायंट्स आणि सीएसके विरुद्ध सामना गमवला आहे.
4 / 6
आरसीबीचा पुढचा सामना पंजाब किंग्ससोबत आहे. हा सामना पंजाबच्या होम ग्राउंडवर आहे. तिथे पंजाबने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबीची चिंता वाढली आहे.
5 / 6
आरसीबीने मोहालीत खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव सहन केला आहे. त्यामुळे आरसीबीला मोहालीत पंजाबकडून कडवी झुंज मिळणार आहे.
6 / 6
आरसीबीने पंजाब विरुद्धचा सहावा गमवल्यानंतर पुढची वाटचाल कठीण होईल. त्यामुळे स्पर्धेत राहण्यासाठी पंजाब किंग्स विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. (Photo : IPL/BCCI)