
आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत पृथ्वी शॉलाही सूर गवसत नव्हता. अखेर पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. पृथ्वी शॉने 38 चेंडूत 54 धावा केल्या.

धर्मशाळा येथे रंगलेल्या सामन्यात पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावलं आणि एक पोझ दिली. तशीच पोझ निधी तापडिया हीने इन्स्टाग्राम पोस्टवर दिली आहे. हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

पृथ्वी शॉ अनेक महिन्यांपासून मॉडेल आणि अभिनेत्री निधा तापडियासोबत एकत्र असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी एकत्र दिसली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली निधी तापडिया हीचे इन्स्टाग्रामवर 1.11 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. बुधवारी धर्मशाळा येथे झालेला सामना पाहण्यासाठी ती आली होती.

निधी तापडिया अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे. सीआयडी या लोकप्रिय मालिकेतही तिने काम केले आहे.

महाराष्ट्रातील नाशिकची असलेली निधी सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामवर चर्चेत असते.

या वर्षाच्या सुरुवातील पृथ्वी शॉने इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीचे फोटो शेअर केले होते. यात त्याच्यासोबत निधी तापडिया दिसली होती.