IPL 2024 : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघातून बाहेर
आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची स्थिती जवळपास मुंबई इंडियन्ससारखीच आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. एकूण चार सामन्यात दिल्लीला तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का बसला आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेतील 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी होणार आहे. दुपारी 3.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जोरदार प्रयत्न करतील. पण तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.
2 / 6
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू असलेला कुलदीप यादव दुखापतीने त्रस्त आहे. कुलदीपला कंबर दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातही खेळला नव्हता.
3 / 6
कुलदीप यादव आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी त्याला देखरेखीखाली ठेवलं जाईल. एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालं की पुन्हा खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. दुखापतीमुळे कुलदीप यादव चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
4 / 6
रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. दुसरीकडे, कुलदीप यादव आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, कुलदीप यादवची दुखापत फारशी गंभीर नाही. सध्या दिल्ली संघासोबत मुंबईतच आहे.
5 / 6
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चार पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ सध्या 9व्या स्थानावर आहे. टॉप चारमध्ये येण्यासाठी दिल्लीला विजय महत्त्वाचा आहे. असं असताना आता अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गैरहजेरीचा फटका बसणार आहे.
6 / 6
कुलदीप यादवने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामने खेळले आणि एकूण तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे, कुलदीप यादव टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. त्यामुळे त्याला दुखापतीतून लवकर सावरणं गरजेचं आहे.