बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता हे तिघे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक आहेत. तसेच मनोज बदाले राजस्थान रॉयल्सचे मालक आहेत.
आरसीबी टीमची मालकी आधी विजय माल्या यांच्याकडे होती. मात्र सध्या मालकी हक्क जिम्मान युनाटेड स्पिरिटकडे आहे. तर पार्थ जिंदाल दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक आहेत. पार्थ जिंदाल हे जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची जबाबदारी सांभाळतात.
अभिनेत्री प्रीती झिंटा, नेस वाडीया, मोहित वर्मन आणि करण पाल हे चौघे पंजाब किंग्सचे मालक आहेत. तर मुकेश अंबानी हे मुंबई इंडियन्सचे सर्वेसर्वा आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत.
गुजरात टायटन्स टीमचे सर्व अधिकार सीवीवी कॅपिटल पार्टनर कंपनीकडे आहेत. तर संजीव गोयंका हे लखनऊ सुपर जायंट्सचे मालक आहेत.
काव्य मारन या सनरायजर्स हैदाराबादचे मालक आहेत. तर स्वामित्वाचे सर्व हक्क हे सन ग्रुपकडे आहेत. तसेच एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्सेच मालक आहेत.