IPL 2024 : आयपीएल स्पर्धेपूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला दोन मोठे धक्के
आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक संघ तयारीला लागला आहे. खेळाडूंची जमवाजमव झाल्यानंतर आता पुढची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. फ्रेंचायसी खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहेत. पण काही खेळाडूंच्या दुखापती डोक्याला ताप ठरत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघालाही याचा धक्का बसला असून दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.
2 / 6
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेपर्यंत फिट होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघात असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जे रिचर्डसन दुखापतीमुळे आयपीएलच्या पूर्वार्धात खेळणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी ही माहिती दिली आहे.
4 / 6
आयपीएलमध्ये एका वर्षानंतर ऋषभ पंत संघाचं नेतृत्व करणार आहे. यष्टीरक्षण करेल की नाही याबाबत साशंकता आहे. पण स्पर्धेसाठी पूर्णपणे फिट असून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
5 / 6
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पीसीए स्टेडियम 23 मार्च रोजी ही लढत असेल. या सामन्याद्वारे ऋषभ पंत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
6 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघ: ऋषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शाह, एनरिक नोकिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल. हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, जे रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिकारा.