रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या जर तरचं समीकरण कायम राखलं आहे.
गुजरातने आरसीबीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 1 विकेट गमावून 4 ओव्हरआधीच पूर्ण केलं.
विल जॅक्सने 41 बॉलमध्ये नाबाद 100 धावा केल्या. विलच्या या खेळीत 5 चौकार आणि 10 सिक्स ठोकले. आरसीबीने यासह 10 सामन्यात तिसरा विजय मिळवला.
विल जॅक्ससह दुसऱ्या बाजूने विराट कोहली यानेही शानदार खेळी केली. विराटने 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची नाबाद भागीदारी केली.
दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. मात्र विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांच्या खेळीमुळे आरसीबीने सहज विजय मिळवला. तसेच विराटने 70 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपमधील अव्वल स्थान आणखी भक्कम केलं.