लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 31 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली. गुजरात विरुद्धच्या सामन्याआधी केएलने लखनऊ विरुद्ध 983 धावा केल्या होत्या.
त्यामुळे केएलला लखनऊ विरुद्ध 1 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 17 धावांची गरज होती. केएलने 7 एप्रिलला 17 वी धाव पूर्ण करताच 1 हजार रन्सचा टप्पा पार केला. केएल लखनऊकडून 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
केएल अद्याप लखनऊ सुपर जायंट्सकडून 28 सामने खेळला आहे. केएलने या 28 सामन्यांमध्ये 42.33 च्या सरासरीने 1 हजार 16 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 2 शतकं आणि 7 अर्धशतकं ठोकली आहेत.
केएलने लखनऊकडन खेळताना एका डावात 103 धावा केल्या आहेत. केएलने ही खेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध 24 एप्रिल 2022 रोजी केली होती.
लखनऊसाठी केएलनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा क्विंटन डी कॉक याच्या नावावर आहे. डी कॉकने 23 सामन्यात 796 धावा केल्या आहेत.
दरम्यान केएल राहुल याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 31.5 च्या सरासरीने 126 धावा केल्या आहेत. केएलने या हंगामात फक्त 1 अर्धशतक ठोकलंय.