आयपीएल 2025 लिलावात ग्लेन मॅक्सवेलवर बोली लागणार की नाही? झालं असं की….

आयपीएल लिलावासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. मेगा लिलावात 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण या मेगा लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेलच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण आरसीबीने रिलीज केल्यानंतर मॅक्सवेलवर बोली लागणार की नाही याबाबत शंका आहे.

| Updated on: Nov 21, 2024 | 7:50 PM
आयपीएल मेगा लिलावापूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली. आरसीबीची रिटेन्शन यादी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला रिलीज केलं होतं. मागच्या पर्वात सुपर फ्लॉप गेल्याने असंच होणार हे निश्चित होतं. पण त्याच्यासाठी आरसीबी आरटीएम कार्ड वापरेल असं बोललं जात होतं. आता तसं होणंही कठीण असल्याचं दिसत आहे.

1 / 6
ग्लेन मॅक्सवेल हा गेल्या काही वर्षांपासून दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अनेक मालिकांना मुकला आहे. तसेच फॉर्मही चिंतेचा विषय ठरला आहे. असं असताना आरसीबीने त्याला रिलीज केलं. पण त्याने केलेली सोशल मिडिया पोस्ट पाहता त्याच्यासाठी फ्रेंचायझी आरटीएम कार्ड वापरण्याची शक्यता वाढली होती.

2 / 6
दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या ग्लेन मॅक्सवेलवर आरसीबी फ्रेंचायझी विश्वास तरी कसा ठेवणार? पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाली आहे. त्यामुळे महिनाभर क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

3 / 6
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेत ग्लेन मॅक्सवेल खेळण्याची शक्यता आहे. या मालिकेपूर्वी त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळायचे होते. पण दुखापतीमुळे खेळणं अशक्य आहे.

4 / 6
ग्लेन मॅक्सवेलने मागच्या महिन्यात ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलून कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मॅक्सवेल सध्या हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे कसोटी फॉर्मेटमध्ये खेळणं कठीण आहे.

5 / 6
तसं पाहिलं तर आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यासाठी अजून चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तिथेपर्यंत मॅक्सवेल बरा होईल. पण हे जर तरच गणित आहे. त्यामुळे मॅक्सवेल बोली लावताना फ्रेंचायझी विचार करतील हे तितकंच खरं आहे. मॅक्सवेल अनसोल्ड राहिला तर आश्चर्य वाटायला नको.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.