Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत नव्या खेळाडूची एन्ट्री, निकोलस पूरनने सर्वांनाच पछाडलं

IPL 2025 Orange Cap Holder: लखनौ सुपर जायंट्सचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने गुरुवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध स्फोटक खेळी केली. पूरनने हैदराबादविरुद्ध 70 धावा केल्या.

| Updated on: Mar 28, 2025 | 5:03 PM
आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमातील (IPL 2025) सातवा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. उभयसंघातील सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. लखनौचा फलंदाज निकोलस पूरनने स्फोटक खेळी केली. पूरनने हैदराबादविरुद्ध अर्धशतकी खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

1 / 6
पूरनने हैदराबादविरुद्ध 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 70 धावा केल्या. पूरनची ही या मोसमातील एकूण आणि सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरली. पूरनने याआधी दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध 75 धावा केल्या. ताज्या आकड्यांनुसार, निकोलस पूरन याच्याकडे ऑरेंज कॅप आहे.

2 / 6
निकोलस पूरन याने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 72.50 च्या सरासरीने आणि 258.92 च्या स्ट्राईक रेटने 145 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पूरनने मिचेल मार्श, ट्रेव्हिस हेड आणि ईशान किशन यांना पछाडलं आहे.

3 / 6
मिचेल मार्श ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्शने हैदराबादविरुद्ध 51 धावा केल्या. मार्शने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 62 च्या सरासरीसह 185.07 च्या स्ट्राईक रेटने  124 धावा केल्या आहेत.

4 / 6
ट्रेव्हिस हेड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेडने 2 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने आणि 193.22 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या आहेत. हेडने लखनौविरुद्ध 167.86 च्या स्ट्राईक रेटने 28 बॉलमध्ये 47 रन्स केल्या.

5 / 6
दरम्यान हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्याआधी ईशान किशनकडे ऑरेंज कॅप होती. ईशान किशनने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली.ईशानने सलामीच्या सामन्यात 106 धावा केल्या. मात्र ईशानला लखनौविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही.

6 / 6
Follow us
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.