RCB: 17 वर्ष, 7 कॅप्टन, तरीही आरसीबी आयपीएल चॅम्पियन होण्यात अपयशी
IPL 2024 RCB : 17 वर्ष 7 कॅप्टन तरीही आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या नावापुढे ट्रॉफीच्या रकान्यात भोपळाच आहे. 7 पैकी एकाही कर्णधाराला आरसीबीला चॅम्पियन करणं जमलं नाही. पाहा आतापर्यंतचे आरसीबीचे कर्णधार.
1 / 6
आरसीबीला 17 व्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात राजस्थानकडून पराभूत व्हावं लागलं. आरसीबीचं यंदाही चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत 17 हंगामात आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. आरसीबीची 17 वर्षात 7 कर्णधारांनी धुरा सांभाळली. मात्र एकाही कॅप्टनला ट्रॉफी उंचावण्यात यश आलं नाही.
2 / 6
सलामीच्या हंगामात राहुल द्रविड याने आरसीबीची कॅप्टन्सी केली. त्यानंतर अनिल कुंबळे याने 2009 साली आरसीबीची सूत्र सांभाळली.
3 / 6
अनिल कुंबळेने 2009 आणि 2010 या 2 हंगामात कॅप्टन्सी केली. त्यानंतर 2011 आणि 2012 साली डॅनियल व्हीटोरी याने धुरा सांभाळली.
4 / 6
व्हीटोरीने विराट कोहली याला कर्णधारपदाचा कारभार सोपवला. विराटने 2013 पासून ते 2021 पर्यंत नेतृत्व केलं.
5 / 6
शेन वॉटसन याने या दरम्यान 2017 साली 3 सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत सूत्र सांभाळली. मात्र यापैकी एकालाही यश आलं नाही.
6 / 6
आयपीएल 2022 ऑक्शननंतर फाफ डु प्लेसिस याला कर्णधार करण्यात आला. फाफचं यंदाचं कर्णधार म्हणून हे तिसरं वर्ष होतं. मात्र फाफच्या नेतृत्वातही आरसीबीला अद्याप तरी यश आलं नाही. आता आरसीबी पुढच्या हंगामात ट्रॉफी जिंकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.