आयपीएल 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. यंदाच्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. पहिल्या सामन्यात धोनीच्या सेनेला आयपीएलमधील सर्वात विस्फोटक जोडीचा सामना करावा लागणार आहे. या जोडीने गेल्या वर्षीही बॅटिंगने झंझावाती खेळी केली होती.
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या दोघांनी आतापर्यंत टीमसाठी विस्फोटक आणि वादळी खेळी केली आहे. या जोडीने गत मोसमात 939 धावा करत मोठ्या विक्रमाची बरोबरी केली होती.
विराट आणि मिस्टर 360 अर्थात एबी डी व्हीलियर्स या दोघांनी 2016 साली आरसीबीसाठी 939 धावा केल्या होत्या.
विराट-फाफ जोडी गेल्या मोसमात 939 धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी ठरले. मात्र यंदा त्यांच्याकडे ही संधी आहे.
आयपीएलच्या इतिहासात 2 भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या नावावर आहे. दोघांनी 2021 मध्ये 744 धावा केल्या होत्या.