IPL Uncapped Bowlers : आयपीएलमध्ये एकाच सामन्यात 5 विकेट घेणारे अनकॅप्ड खेळाडू, यादीत कोण कोण आहे वाचा
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवालने कमाल केली. 5 धावा देऊन 5 गडी बाद केले. यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला आणि लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. आकाश आयपीएल स्पर्धेत 5 गडी बाद करणारा चौथा अनकॅप्ड खेळाडू आहे.
1 / 6
आतापर्यंत 5 बळी घेतलेल्या अनकॅप्ड खेळाडूंमध्ये आकाश मढवालची सर्वोच्च कामगिरी आहे.
2 / 6
आयपीएल क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत कोण कोण गोलंदाज आहेत ते पाहुयात.
3 / 6
अंकित राजपूत हा आयपीएल क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारा अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतील पहिला खेळाडू आहे. 2018 च्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सकडून खेळलेल्या अंकितने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध कामगिरी केली. त्या सामन्यात अंकितने केवळ 14 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या.
4 / 6
अंकितनंतर वरुण चक्रवर्ती याचा नंबर येतो. वरुण चक्रवर्तीने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आयपीएल 2020 हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली. अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात वरुणने 20 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. 5 विकेट घेणारा तो दुसरा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
5 / 6
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिकही या यादीत आहे. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात उमरानने 25 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. 5 विकेट घेणारा तो तिसरा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
6 / 6
मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू आकाश मधवाल नुकताच या यादीत सामील झाला आहे. आकाशने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 5 धावा देत आणि 5 बळी घेत ही कामगिरी केली.