Rinku Singh | रिंकू सिंह याची स्वप्नपूर्ती, टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण
Rinku Singh Ireland vs India 1st T20I | रिंकू सिंह याला गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा अखेर संपली. रिंकूने आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली आहे.
1 / 5
आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाकडून 2 खेळाडूंनी पदार्पण केलं. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं.
2 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन जसप्रीत बुमराह याने रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना टीम इंडियाची कॅप देऊन स्वागत केलं.
3 / 5
प्रसिद्ध कृष्णा याने याआधी टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र प्रसिद्धला टी 20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर प्रसिद्धला दुखापतीनंतरच्या अनेक महिन्यांनी आयर्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली.
4 / 5
रिंकू सिंह याचं आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरलं. आपल्या मुलाने टीम इंडियासाठी खेळावं, असं स्वप्न रिंकूच्या आईचं होतं. अखेर रिंकूचं आणि त्याच्या आईचं स्वप्न हे आयर्लंड विरुद्ध पूर्ण झालं.
5 / 5
रिंकूनं आयपीएल 16 व्या मोसमात (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करताना शानदार कामगिरी केली. रिंकूला त्या आधारावर टीम इंडियात संधी देण्यात आली. आता आयर्लंड विरुद्धच्या या पहिल्या सामन्यात रिंकूच्या बॅटिंगकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.