आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, या संघाला पाजलं पराभवाचं पाणी

| Updated on: Mar 01, 2024 | 8:14 PM

आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. 2018 मध्ये आयर्लंडला क्रिकेटचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर सहा वर्षातच कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. संयुक्त अरब अमीरातच्या अबुधाबीत खेळलेल्या सामन्यात आयर्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवला.

1 / 6
आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटीत अफगाणिस्तानला पराभूत करत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेट कारकिर्दितील आयर्लंडचा हा पहिला विजय आहे. तर अफगाणिस्तानला सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

2 / 6
अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच डावात अफगाणिस्तानवर नामुष्की ओढावली. 155 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. तर आयर्लंडने सर्वबाद 263 धावा केल्या आणि 108 धावांची आघाडी घेतली.

3 / 6
दुसऱ्या डावात अफगाणिस्तानने 218 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानने केलेली आघाडी वजा करता विजयासाठी 111 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान आयर्लंडने 4 गडी गमवून पूर्ण केलं. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच आयर्लंडने हे लक्ष्य गाठलं.

4 / 6
आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी 58 धावा करून नाबाद राहिला. तर लॉर्कन टकरने 27 धावांची खेळी केली. आयर्लंडला कसोटीत पहिला विजय मिळवण्यासाठी 8 सामन्यांची वाट पाहावी लागली.

5 / 6
कसोटी खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर आयर्लंडने पहिला कसोटी सामना 2018 मध्ये पाकिस्तानशी खेळला होता. त्यानंतर अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेने पराभूत केलं. आता आयर्लंडने अफगाणिस्तानला पराभूत केलं.

6 / 6
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), पीटर मूर, कर्टिस कॅम्फर, अँडी मॅकब्राईन, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​थिओ व्हॅन वोरकॉम