आता सगळीकडे टी-20 विश्वचषकाची वाट पाहिली जातेय. यासाठी भारतीय संघ सराव देखील करत आहे. मात्र, यात रवींद्र जडेजी कमी आहे. तो दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यानं संघात तो नाहीये. हाच संघासाठी मोठा धक्काही मानला जातोय.
गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनं जडेजाला काही महिनं तरी संघापासून दूर असणार आहे. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं जडेजा वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये खेळू शकला नव्हता. आशिया करंडक मध्यातून सोडावा लागला होता.
जडेजाविषयी जयवर्धन आयसीसीसोबत बोलताना म्हटला की, जडेजा पाचव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो. हार्दिक हा सहाव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो.
तुम्हाला हे माहिती आहे का की, जडेजा डाव्या हातानं फलंदाजी करतो. यामुळे आता विश्वचषकात संघाला डावखुऱ्या फलंदाजाची उणीव भासेल.
दिनेश कार्तिकला टीममध्ये घेण्याऐवजी रिषभ पंतला खेळवल्यास डावखुऱ्या फलंदाजांची उणीव भरून निघू शकते. पण, या जर-तर च्या गोष्टी आहे.