कांगारुंच्या भूमीत बुमराहच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद, चौथ्या कसोटीतच मिळवला मान
मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने इतिहास रचला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद केले आणि एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घेऊयात
1 / 5
मेलबर्न कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने 105 धावांच्या आघाडीसह पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 228 धावा केल्या. नाथन लियॉन नाबाद 41, तर स्कॉट बोलँड नाबाद 10 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकूण 333 धावा झाल्या आहेत.
2 / 5
जसप्रीत बुमराहने या कसोटी सामन्यात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या आहेत. यासह जसप्रीत बुमराहने 4 सामन्यात एकूण 29 विकेट नावावर केल्या आहेत.
3 / 5
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील एका पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान जसप्रीत बुमराहाला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेन हिल्फेनहॉसच्या नावावर होता.
4 / 5
2011-12 बॉर्डर-गावस्कर मालिकेत बेन हिल्फेनहॉसने 4 सामन्यात 1008 चेंडूत एकूण 27 विकेट घेतल्या होत्या. बॉर्डर-गावस्कर हे ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर कसोटी मालिकेतील एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
5 / 5
आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हा 12 वर्षे जुना विक्रम मोडण्यात यश मिळवले आहे. या मालिकेत बुमराहने 4 सामन्यात 778* चेंडू टाकले आहेत आणि 29* बळी घेतले घेतले आहेत.