बीसीसीआयचे विद्यमान सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची 27 ऑगस्टला संध्याकाळी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणारे पाचवे भारतीय ठरले आहेत. याआधी कोणत्या भारतीयांनी ही जबाबदारी सांभाळली आहे, हे जाणून घेऊयात. (PC - Icc)
जगमोहन दालमिया आयसीसी अध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले. डालमिया यांनी 1997 ते 2000 या दरम्यान अध्यक्षपदाची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. दालमिया यांचं भारतीय क्रिकेटच्या विकासात मोलाचं योगदान राहिलं. (PC - Reuters)
त्तकालिन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार क्रिकेट विश्वातही रिमोट कन्ट्रोल या भूमिकेत राहिले. शरद पवार आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे दुसरे भारतीय ठरले. त्यांनी 2010-2012 या दरम्यान आयसीसी अध्यक्ष म्हणून सूत्रं सांभाळली. तसेच पवार हे 2005 ते 2008 दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेत. (PC - AFP)
एन श्रीनिवासन हे तिसरे भारतीय होते ज्यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. श्रीनिवासन यांनी 2014-2015 दरम्यान क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या पदाची सूत्रं सांभाळली. तसेच श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई या संघाचे सहमालक आहेत. (PC - AFP)
शशांक मनोहर हे आयसीसीचं अध्यक्षपद भूषवणारे चौथे भारतीय ठरले. मनोहर इतर भारतीयांच्या तुलनेत सर्वाधिक काळ या पदावर राहिले. मनोहर यांनी 2015-2020 दरम्यान ही जबाबदारी सांभाळली. (PC - PTI)