मुंबई इंडियन्सचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये इतिहास रचला. रोहित अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.
रोहितने आयपीएलमध्ये 12 वर्षांनतर शतक ठोकलं. रोहितने चेन्नई विरुद्ध 63 बॉलमध्ये 105 धावांची खेळी केली. रोहितच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं.
रोहितने या शतकी खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. रोहितने 166.67 च्या स्ट्राईक रेटने या 105 धावा केल्या.
रोहितने या खेळी दरम्यान इतिहास रचला. रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये 500 शतकांचा टप्पा पार केला. रोहित अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला.
रोहितने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर 11 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर सिक्स ठोकून 500 षटकारांचा टप्पा गाठला. रोहित शर्माने 432 सामन्यांमधील 419 डावात ही कामगिरी केली.
रोहितने 500 पैकी 270 सिक्स आयपीएलमध्ये ठोकले आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने स 1 हजार 56 सिक्स ठोकले आहेत.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.