शुबमन गिलच्या नावावर मोठा विक्रम, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला

शुबमन गिलने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 38 धावा केल्या. यासह शुबमन गिलने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या

| Updated on: Mar 29, 2025 | 9:54 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेतील  नववा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांना पहिल्या विजयाची आस आहे. दुसरीकडे, शुबमन गिलने या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावावर केला  आहे.

2 / 5
शुबमन गिलने  27 चेंडूत 38 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने एकाच मैदानात सर्वात वेगवान 1000 धावा करण्याचा विक्रम रचला आहे. एकाच मैदानात वेगाने 1000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

3 / 5
शुबमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 डावात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेलने बंगळुरुत 19 डावात हा आकडा गाठल्याने पहिल्या स्थानावर आहे.

4 / 5
शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. गिल चांगली फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण हार्दिकने त्याला तंबूत पाठवले.

5 / 5
गिलने 2023 मध्ये याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 धावांची खेळी खेळली होती. 2024 मध्ये गिलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक ठोकलं होतं. गिलने आयपीएलमध्ये एकूण 4शतके झळकावली असून 3 शतके या मैदानावर झळकावली आहेत. (सर्व फोटो- गुजरात टायटन्स ट्वीटर)