IPL : रोहित शर्मा 5 वेळा चॅम्पियन टीमचा कॅप्टन, पण तो डाग कधीही न पुसला जाणारा
यंदाच्या IPL चा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल कधी एकदा सुरू होते याची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात मोठं नाव आहे. IPL मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईच्या इंडिअन्सच्या कर्णधारावर खराब रेकॉर्ड आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडिअन्सला एक दोनदा नाहीतर तब्बल 5 वेळा चॅम्पिअन बनवलं आहे. मात्र रोहितच्या नावावर एक वाईट रेकॉर्ड असेल याची कोणीच कल्पनाही केली नसेल.
Follow us

रोहित शर्मासह आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम मनदीप सिंगच्या नावावरही आहे. तोसुद्धा 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
या यादीत सलामीवीर पार्थिव पटेलचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
हरभजन सिंग आयपीएलच्या इतिहासात 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएलमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पियूष चावलाही आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.