ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट
तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 ने पराभव केला होता. आता श्रीलंकेविरुद्धही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला त्याचीच पुनरावृत्ती करायला आवडेल. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ लढतील. पण दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्येदेखील एक वेगळी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
1 / 6
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने अलीकडेच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिजचा पराभव केला. तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला होता. आता श्रीलंकेविरुद्धही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला त्याचीच पुनरावृत्ती करायला आवडेल. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ लढतील. पण दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्येदेखील एक वेगळी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा षटकारांची आहे. (BCCI/File Pic)
2 / 6
दोन्ही देशांदरम्यान खेळवण्यात आलेल्या T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम कुशल परेराच्या नावावर आहे. परेराने भारताविरुद्ध नऊ सामने खेळले असून त्यात एकूण 14 षटकार लगावले आहेत. (File Pic)
3 / 6
भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित आणि परेराच्या नावावर 14-14 षटकार असले तरी रोहितने परेरापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या 15 सामन्यात 14 षटकार लगावले आहेत. या मालिकेत रोहित हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. (BCCI Photo)
4 / 6
भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, धवन या मालिकेत संघाचा भाग नाही. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या 12 सामन्यात 12 षटकार लगावले आहेत. (File Pic)
5 / 6
भारताच्या दोन विश्वचषक विजयात महत्त्वाचा वाटा असलेला युवराज सिंग या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. युवराजने 2009 ते 2016 पर्यंत श्रीलंकेविरुद्ध नऊ टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यात 11 षटकार ठोकले आहेत. (File Pic)
6 / 6
केएल राहुल आणि श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका संयुक्तपणे 5 व्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी 10 षटकार लगावले आहेत. राहुलने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 8 सामन्यात तर दासूनने 15 सामन्यात इतके षटकार ठोकले आहेत. राहुल दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नाही, अशा स्थितीत दासून त्याला मागे टाकू शकतो. (File Pic)