IPL मधील सर्वात अपयशी कॅप्टन, धोनी कितव्या स्थानी? नंबर 1 कोण?
Worst captains in the history of IPL :: रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी हे दोघे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितने मुंबईला आणि धोनीने चेन्नईला प्रत्येकी 5 वेळा चॅम्पियन केलं. मात्र सर्वात अपयशी कर्णधार कोण? माहितीय? जाणून घ्या.
1 / 6
आयपीएलच्या इतिहासात सर्वात अपयशी कर्णधारांच्या यादीत आरसीबीचा विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीला 70 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.
2 / 6
रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. रोहितने मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत एकूण 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र रोहित कॅप्टन असताना मुंबईला 67 सामन्यात पराभूत व्हाव लागलं आहे.
3 / 6
चौथ्या स्थानी गौतम गंभीर आहे. गौतम गंभीरने आपल्या कॅप्टन्सीत केकेआरला 2 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली. गंभीरने केकेआर व्यतिरिक्त दिल्लीचं नेतृत्व केलं. गंभीर कॅप्टन म्हणून 57 सामन्यांमध्ये अपयशी ठरला.
4 / 6
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरला 40 सामन्यात अपयश आलं. वॉर्नरनंतर एडम गिलख्रिस्टचा नंबर लागतो. गिलख्रिस्टच्या कॅप्टन्सीत एकूण 39 सामन्यात पराभव झाला आहे.
5 / 6
सक्रीय कर्णधारांच्या यादीत केएल राहुल टॉपर आहे. केएल 31, श्रेयस अय्यर 29 सामन्यात अपयशी ठरला आहे. तर संजू सॅमसनने कॅप्टन म्हणून 28 सामने गमावला आहेत.
6 / 6
तर सर्वात अपयशी कर्णधार असण्याचा नकोसा विक्रम हा महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीला कॅप्टन म्हणून तब्बल 91 सामने जिंकून देण्यात अपयश आलं आहे.