महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिल्या हंगामातील प्लेऑफसाठी 4 संघ ठरले आहेत.रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स आणि पुणेरी बाप्पा अशा 4 संघाना प्लेऑफमध्ये पोहचण्यात यश आलंय. आता 4 संघांमध्ये एमपीएल चॅम्पियन होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरी जेट्सने या हंगामात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केलीय. रत्नागिरी जेट्सने 5 पैकी 4 वेळा विजय मिळवला. तर फक्त एकाच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. रत्नागिरी जेट्स 8 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे.
ईगल नाशिक टीमने 4 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.
केदार जाधव याच्या कॅप्टन्सीत कोल्हापूर टस्कर्सने 4 पैकी 3 सामन्यात प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केलाय. तर केवळ एका समन्यात अपयश आलं.
पुणेरी बाप्पाने या हंगामातील 5 सामन्यांमध्ये 2 वेळा विजय मिळवलाय. तर 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला आपल्या नेतृत्वात टीमकडून चमकदार कामगिरी करवून घेता आली नाही.