Cricket Duck | सूर्यकुमार यादव याच्यानंतर आणखी एक बॅट्समन तिसऱ्यांदा झिरोवर आऊट

| Updated on: Mar 25, 2023 | 7:01 PM

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन टी 20 स्पेशालिस्ट सुर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सपशेल अपयशी ठरला. यामुळे सू्र्यावर सडकून टीका करण्यात आली. आता सूर्याप्रमाणे आणखी एका फलंदाजाची स्थिती झाली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग 3 सामन्यात झिरोवर आऊट झाला. त्यामुळे सूर्याला टीकेचा सामना करावा लागला. प्रत्येक फलंदाजाला या स्थितीतून जावं लागतं. मात्र यानंतरही झिरोवर आऊट होऊनही काही फलंदाज आपली छाप सोडून जातात. एशियामधील 3 महत्वाच्या फलंदाजांना शून्य ग्रहण लागलंय.

2 / 5
सूर्या हा त्याच्या डावात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 वनडे सामन्यातील पहिल्याच बॉलवर शून्यावर आऊट झाला. यामुळे सूर्या एकच चर्चेत आला.

3 / 5
सूर्यासारखीच परिस्थिती ही पाकिस्तानचा फलंदाज अब्दुल्लाह शफीक याची झाली आहे. अब्दुल्लाह हा अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. यासह अब्दुल्लाह याची ही शून्यावर बाद होण्याची तिसरी वेळ ठरली. अब्दुल्लाह हा याआधी गेल्यावर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील 2 सामन्यात  अशीच स्थिती झाली.

4 / 5
झिरोवर आऊट होण्याची साथ ही श्रीलंका क्रिकेट टीमपर्यंत जाऊन पोहचली आहे. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुशल मेंडीस या स्थितीचा सामना करतोय. कुशल न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेत भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. मेंडिसने काही शून्याची हॅटट्रिक नाही केली. मात्र तो झिरोवर आऊट झाल्याने चर्चा मात्र रंगलीय.

5 / 5
मेंडीस सूर्यकुमार आणि अब्दुल्लाह यांच्याप्रमाणे पहिल्या-दुसऱ्या बॉलवर आऊट झालेला नाही. कुशल मैदानात बऱ्याच वेळ होता, मात्र त्याला धावा करता आल्या नाहीत. कुशल सलग 15 बॉलवर एकही धाव करु शकला नाही, तर 16 व्या बॉलवर आऊट झाला.