पाकिस्तानकडून वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला क्लिन स्विप, क्रिकेट इतिहासात नोंदवला विक्रम

पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा असणार आहे. वनडे फॉर्मेटमधील स्पर्धेसाठी पाकिस्तानचा जोरदार सराव झाल्याचं दिसत आहे. कारण दक्षिण अफ्रिकेला त्यांच्यात भूमीत लोळवून एका विक्रमाची नोंद केली आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली.

| Updated on: Dec 23, 2024 | 3:14 PM
पाकिस्तानची दक्षिण अफ्रिकेत दमदार कामगिरी सुरु आहे. पहिल्यांदा टी20 मालिकेत दक्षिण अफ्रिकेला धोबीपछाड दिला. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली.

पाकिस्तानची दक्षिण अफ्रिकेत दमदार कामगिरी सुरु आहे. पहिल्यांदा टी20 मालिकेत दक्षिण अफ्रिकेला धोबीपछाड दिला. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली.

1 / 5
तिसर्‍या वनडे सामन्यात पाकिस्ताने सैम अय्युबने जबरदस्त खेळी करत 94 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर बाबर आझमने 52 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार मोहम्मद रिझवानने 53 धावा केल्या.

2 / 5
पाकिस्तानने 47 षटकात 9 गडी गमवून 308 धावा केल्या आणि विजयासाठी 309 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेला हे लक्ष्य गाठणं काही जमलं नाही. 42 षटकात सर्व गडी बाद 271 धावा करता आल्या. पाकिस्तानने तिसरा सामना 36 धावांनी जिंकला.

3 / 5
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर  व्हाईटवॉश देणारा पाकिस्तान हा जगातील पहिला संघ ठरला आहे.  दक्षिण आफ्रिकेला वनडे क्रिकेटच्या 53 वर्षांच्या इतिहासात कोणीही क्लीन स्विप दिलेला नाही.

4 / 5
पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 3 गडी राखून, दुसऱ्या सामन्यात 81 धावांनी,  तर तिसऱ्या सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला आहे. आता पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका दक्षिण अफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.