यंदा भारतात ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड कपसाठी भारतात येण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ड्रामेबाजी सुरु आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या दोन वेन्यूमध्ये बदल करण्याची मागणी केलीय. आता त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिलाय.
पाकिस्तानी न्यूज चॅनल जियो न्यूजनुसार, पीसीबीने अफगाणिस्तान विरुद्ध सराव सामना खेळण्यास नकार दिला आहे. पीसीबीने आयसीसीकडे लिखित मागणी केली आहे.
आपल्या टीमने अफगाणिस्तान विरुद्ध खेळू नये, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला का वाटतं? अफगाणिस्तान विरुद्ध आम्ही लीगमध्ये खेळणार आहोत. त्यामुळे बिगर आशियाई टीमसोबत आम्हाला खेळायच आहे, असं पीसीबीने म्हटलय.
पाकिस्तान बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्याचा वेन्यू बदलण्याची मागणी केली होती. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बंगळुरुमध्ये खेळायच आहे. अफगाणिस्तान विरुद्ध चेन्नईत सामना होणार आहे.
अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज अडचणीत आणू शकतात, ही भिती असल्यामुळे पाकिस्तानी टीमला चेन्नईमध्ये खेळायच नाहीय. तेच बंगळुरुच्या छोट्या मैदानात ऑस्ट्रेलियन फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांचा खेळ बिघडवू शकतात, ही भिती त्यांच्या मनात आहे.