Pakistan Team : आशिया आणि वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान ठरणार वरचढ ! ही रणनिती ठरेल यशस्वी
पाकिस्तान संघ गेल्या काही दिवसात जबरदस्त कामगिरी करत आहे. टेस्ट असो की वनडे फॉर्मेट पाकिस्ताननं आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी खास रणनिती आखल्याचं दिसून येत आहे.
1 / 5
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी पाकिस्ताननं कंबर कसली आहे. 1992 पासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुष्काळ संपण्याचा प्रयत्न असणार आहे. पाकिस्तानची आशिया आणि वनडे वर्ल्डकपसाठी कशी रणनिती असेल? ते जाणून घेऊयात..(AFP Photo)
2 / 5
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याची मुख्य निवड समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इंजमामने क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आहे. तसेच चांगला अनुभव गाठिशी आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप संघात खेळाडूंची निवड करणं पाकिस्तान संघाला फायदेशीर ठरू शकते. (AFP Photo)
3 / 5
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या श्रीलंका टी20 लंका प्रीमियर लीग खेळत आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून बाबर आझम जोरदार तयारी करताना दिसत आहे. कॅनडा टी20 लीगमध्ये खेळण्याची संधी होती पण त्याने वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून लंका लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका आणि भारताची स्थिती जवळपास सारखी असल्याने फायदा होणार आहे. (AFP Photo)
4 / 5
पाकिस्तानचा संघ ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. पण ही सीरिज श्रीलंकेत होणरा आहे. त्यामुळे पाकिस्तानला फायदा होईल. अफगाणिस्तान संघाची गोलंदाजी बाजू भक्कम आहे. त्याच उत्तम फिरकीपटू ही जमेची बाजू आहे. त्यामुळे भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करणाऱ्या असल्याने पाकिस्तानला या मालिकेतून चाचपणी करता येईल. फिरकीपटूंचा सामना करून संघाला तयार होता येईल. दुसरीकडे, श्रीलंकेतच आशिया कपचे नऊ सामने खेळले जाणार आहेत. (AFP Photo)
5 / 5
पाकिस्तान संघात गेल्या काही दिवसात काही बदल करण्यात आले आहेत. पीसीबी चेअरमनपासून सिलेक्टरपर्यंत अनेक बदल करण्यात आले. दुसरीकडे, मिकी आर्थरला कोचिंग स्टाफमध्ये ठेवलं आहे. आर्थर यांच्या प्रशिक्षकपदाच्या नक्कीच पाकिस्तानला फायदा होईल. (AFP Photo)