पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवत भारताने कांस्य पदक नाावर केलं आहे. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक आपल्या नावावर केलं आहे. या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगची महत्त्वाची भूमिका राहिली.
स्पेन विरूद्धच्या करो या मरोच्या लढाईत कर्णधार हरमनप्रीत सिंगची कामगिरी मोलाची ठरली. त्याने कांस्य पदकाच्या महत्त्वाच्या सामन्यात दोन गोल केले. त्यामुळे स्पेनला 2-1 ने पराभूत करता आलं.
हरमनप्रीत सिंगने या स्पर्धेत जबददस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. साखळी फेरीतील पाच पैकी चार सामन्यात गोल केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलिया, उपांत्य फेरीत जर्मनी आणि कांस्य पदकाच्या लढाईत स्पेनविरुद्ध गोल केला.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने पूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 10 गोल केले आहेत. यापूर्वी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतासाठी सर्वाधिक 6 गोल केले होते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघ : पी आर श्रीजेश (गोलकीपर), जरमनप्रीत सिंग (डिफेंडर), अमित रोहिदास (डिफेंडर), हरमनप्रीत सिंग (डिफेंडर), सुमित (डिफेंडर), संजय (डिफेंडर), राजकुमार पाल (मिडफील्डर), शमशेर सिंह (मिडफील्डर), मनप्रीत सिंह (मिडफील्डर), हार्दिक सिंह (मिडफील्डर), विवेक सागर प्रसाद (मिडफील्डर), अभिषेक (फॉरवर्ड), सुखजीत सिंह(फॉरवर्ड), ललित कुमार उपाध्याय (फॉरवर्ड), मंदीप सिंह (फॉरवर्ड), गुरजंत सिंह (फॉरवर्ड). राखीव खेळाडू: नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादुर पाठक.