IPL Auction : ऋषभ पंतची आयपीएल लिलावात होणार चांदी! इतके कोटी मिळणार असल्याचा दावा
आयपीएल मेगा लिलावासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये लिलाव पार पडणार असून 574 खेळाडूंची नावं यादीत आहेत. या यादीत पहिल्या 6 खेळाडूंमध्ये दिग्गजांचा लिलाव होणार आहे. यात ऋषभ पंतचही नाव आहे.
![आयपीएल 2025 अर्थात 18व्या पर्वासाठी मेगा लिलाव पार पडणार आहे. खेळाडू रिटेन केल्यानंतर उर्वरित खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यात काही दिग्गज खेळाडू रिलीज केल्याने त्यांची चर्चा रंगली आहे. पहिल्या सहा टप्प्यात या दिग्गज खेळाडूंचा विचार होणार आहे. पहिल्याच फेरीसाठी ऋषभ पंतचं नाव आहे. त्यासाठी फ्रेंचायझी खिसा रिता करतील असा दावा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Rishabh_Pant_Auction-4-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केलं आहे. दोन कोटी बेस प्राईससह ऋषभ पंत या मेगा लिलावात उतरला आहे. पंतमधील नेतृत्व गुण, आक्रमक फलंदाजी आणि ब्रँड व्हॅल्यू पाहून त्याच्यासाठी मोठी बोली लागणार यात शंका नाही. त्याच्या 25 कोटींच्या पारच बोली लागेल असा दावा सुरेश रैनाने केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Rishabh_Pant_Auction-3.jpg)
2 / 5
!["मला वाटते की ऋषभ पंतला 25 ते 30 कोटी रुपये मिळाले पाहिजेत. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भरघोस रक्कम दिली जाते. पंत सर्वच पातळ्यांवर उजवा ठरला आहे. त्यामुळे त्याला मोठी रक्कम मिळाली पाहीजे. त्यामुळे ऋषभ पंतसाठी 30 कोटींची बोली लागेल अशी अपेक्षा आहे.", असं सुरेश रैना याने सांगितलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Rishabh_Pant_Auction-2.jpg)
3 / 5
![ऋषभ पंत लिलावाच्या पहिल्याच फेरीत येणार असल्याने सर्वच फ्रेंचायझींचं पर्स भरलेलं असेल. त्यामुळे त्याला घेण्यासाठी कितीही रक्कम मोजण्याची तयारी आहे. त्यामुळे एकाच वेळी पाच सहा फ्रेंचायझी बोली लावतील यात शंका नाही. यामुळे बोली लावताना ही रक्कम 25 ते 30 कोटीपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Rishabh_Pant_Auction-1.jpg)
4 / 5
![मागच्या पर्वात ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने 16 कोटी रुपये दिले होते. पण यावेळी त्याचं आणि फ्रेंचायझीमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. पैसे हा मुद्दा नसल्याचं ऋषभ पंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऋषभ पंतसाठी दिल्ली आरटीएम कार्डही वापरेल असं वाटत नाही. त्यामुळे ऋषभ पंतसाठी पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स मोठी बोली लावतील असा अंदाज आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Rishabh_Pant_Auction.jpg)
5 / 5
![शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? जाणून घ्या शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/shani-ki-sade-sati-kitni-baar-aati-hai.jpg?w=670&ar=16:9)
शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? जाणून घ्या
![बदामापेक्षाही जादा ताकदवान आहे हे ड्रायफ्रूट्स, हाडांना लोखंड बनवते बदामापेक्षाही जादा ताकदवान आहे हे ड्रायफ्रूट्स, हाडांना लोखंड बनवते](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-gettyimages-1140397360-170667aITG-1734951812980-1.jpg?w=670&ar=16:9)
बदामापेक्षाही जादा ताकदवान आहे हे ड्रायफ्रूट्स, हाडांना लोखंड बनवते
![पाच हजार कोटींचे लग्न, वर 60 वर्षांचा...कोण आहे 55 वर्षांची वधू पाच हजार कोटींचे लग्न, वर 60 वर्षांचा...कोण आहे 55 वर्षांची वधू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-jeff-bezos-2.jpg?w=670&ar=16:9)
पाच हजार कोटींचे लग्न, वर 60 वर्षांचा...कोण आहे 55 वर्षांची वधू
![Vinod Kambli : विनोद कांबळीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर का? या बँकेच 55 लाखांच होम लोन का? Vinod Kambli : विनोद कांबळीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर का? या बँकेच 55 लाखांच होम लोन का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-Vindo-Kambli.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर का? या बँकेच 55 लाखांच होम लोन का?
![Mandira Bedi : क्रिकेट लेजेंड्सकडून सेक्सिस्ट ट्रीटमेंट, रोज रडायची, मंदिरा बेदीचा धक्कादायक खुलासा Mandira Bedi : क्रिकेट लेजेंड्सकडून सेक्सिस्ट ट्रीटमेंट, रोज रडायची, मंदिरा बेदीचा धक्कादायक खुलासा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-23T175112.228.jpg?w=670&ar=16:9)
Mandira Bedi : क्रिकेट लेजेंड्सकडून सेक्सिस्ट ट्रीटमेंट, रोज रडायची, मंदिरा बेदीचा धक्कादायक खुलासा
![Chrsitmas : हॅपी नव्हे मेरी ख्रिसमस असंच का म्हणतात ? Chrsitmas : हॅपी नव्हे मेरी ख्रिसमस असंच का म्हणतात ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/christmas-wish-main.jpg?w=670&ar=16:9)
Chrsitmas : हॅपी नव्हे मेरी ख्रिसमस असंच का म्हणतात ?