IND vs AFG 3rd T20 | बंगळुरुमध्ये टीम इंडियाने तिसरा T20 चा सामना जिंकला. फरक इतकाच की, हा विजय थोडा जास्त रोमांचक होता.
टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही 212 धावा करुन मॅच टाय केली.
त्यानंतर सुपर ओव्हर झाली. त्यात अफगाणिस्तानने 16 धावा केल्या. टीम इंडियाने सुद्धा 16 रन्स केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली. टीम इंडियाने फक्त 11 धावा केल्या.
त्यानंतर रवी बिश्नोईने उत्तम गोलंदाजीच प्रदर्शन करत अफगाणिस्तानला विजयी टार्गेटपर्यंत पोहोचू दिलं नाही. टीम इंडिया मॅच जिंकली, पण या दरम्यान विराट कोहलीसोबत जे झालं, ते पाहून सगळेच हैराण आहेत.
क्रिकेट विश्व विराट कोहलीला चेज मास्टर म्हणून ओळखते. दबावाच्या क्षणी भले-भले गोलंदाज समोर विराट कोहली असेल, तर घाबरतात. टीम इंडियाने त्याच विराट कोहलीवर विश्वास दाखवला नाही.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात दोनवेळा मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. दोन्हीवेळा रोहित-द्रविड जोडीने विराट कोहलीला फलंदाजीची संधी दिली नाही.
रोहित शर्माने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंह यांना विराट कोहलीवर प्राधान्य दिलं. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सुद्धा विराट कोहलीच्या जागी संजू सॅमसनला प्राधान्य दिलं.
महत्त्वाच म्हणजे, ज्या फलंदाजांना विराट कोहलीच्या जागी प्राधान्य दिलं, ते काही करु शकले नाहीत. जैस्वालने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 2 धावा केल्या. रिंकू सिंह दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर आऊट झाला.
संजू सॅमसन सुद्धा सुपर ओव्हरमध्ये खात उघडू शकला नाही. रोहित-द्रविड जोडीने ज्या फलंदाजांना संधी दिली, त्यांच्यात भले सिक्स मारण्याची क्षमता असेल, पण प्रेशर सिच्युएशनमध्ये धावा बनवण्याच्या बाबतीत ते विराटपेक्षा खूपच मागे आहेत.
T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर ओव्हरची परिस्थिती ओढवली, तर रोहित शर्माने विराट कोहलीवर विश्वास दाखवला तर ते फायद्याच ठरेल.