वनडे मालिकेत रोहित शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, धोनी-द्रविडला टाकणार मागे
टी20 मालिकेत यश मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी सुरु होणार आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्मा एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. कोणता विक्रम रचणार ते जाणून घेऊयात
1 / 5
टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपासून पुन्हा मैदानात फटकेबाजी करताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात येथून पुढे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंतचा प्रवास सुरु होणार आहे.
2 / 5
वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा एक मैलाचा दगड गाठणार आहे. रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविड यांना मागे टाकणार आहे.
3 / 5
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 10709 धावा केल्या आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 65 धावा करताच महेंद्रसिंह धोनी आणि 181 धावा करताच राहुल द्रविडला मागे टाकेल. धोनीने वनडेत 10773 आणि राहुल द्रविडने 10889 धाव केल्या आहेत.
4 / 5
तीन वनडे सामन्यात रोहित शर्मा 291 धावांचा पल्ला गाठण्यास यशस्वी झाला तर वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण होतील. आतापर्यंत ही कामगिरी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुलीने केली आहे.
5 / 5
श्रीलंकेविरुद्ध भारताचा वनडे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.