Rohit Sharma इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज, नेट्समध्ये जोरदार सराव

| Updated on: Jan 23, 2024 | 3:47 PM

IND vs ENG Test Series | इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. रोहित शर्मा भारताचं कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितने या मालिकेआधी जोरदार सराव केला आहे.

1 / 5
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित या फोटोंमध्ये जोरदार सराव करताना दिसतोय.

2 / 5
रोहितने त्याच्या कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 54 सामन्यांमधील 92 डावात 3 हजार 737 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितचा कसोटी क्रिकेटमध्ये 212 धावा ही सर्वोच्च कामगिरी आहे.

3 / 5
रोहितने अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्थात अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यामध्ये 121 धावांची खेळी केली होती. रोहितकडून अशीच खेळी इंग्लंड विरुद्ध अपेक्षित असणार आहे.

4 / 5
रोहितने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये फार पडलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केलेली. रोहितने कॅप्टन्सीसह 11 सामन्यांमध्ये 597 धावा केल्या होत्या.

5 / 5
रोहितने आतापर्यंत व्हाईट बॉल क्रिकेट अर्थात वनडे आणि टी 20 मध्ये गगनचुंबी सिक्स खेचले आहेत. तर कसोटीमध्ये रोहितच्या नावावर 77 सिक्स आहेत.