IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा रचणार हा विक्रम, वाचा काय ते

| Updated on: Sep 18, 2023 | 7:53 PM

IND vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेकडे रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. या मालिकेत रोहित शर्मा विक्रमांची नोंद करणार आहे.

1 / 6
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आशिया कप 2023 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थान आहे. आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मा याने नवे विक्रम प्रस्थापित केले. आता नव्या विक्रमांच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

2 / 6
आशिया कप 2023 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. सहा सामन्यातील पाच डावात त्याने 11 षटकार मारले. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे.

3 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा याने एकूण 78 षटकार मारले आहेत. या यादीत ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या स्थानी असून 44 षटकार मारले आहेत.

4 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा याने 78 षटकार, ग्लेन मॅक्सवेल याने 44 षटकार, सचिन तेंडुलकर याने 35, एमएस धोन याने 33 आणि एरोन फिंच याने 32 षटकार मारले आहेत.

5 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याने एकूण 553 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्मा याच्या नावावर 545 षटकार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत 9 षटकार मारताच हा विक्रम मोडीत निघणार आहे. रोहित शर्मा सिक्सर किंग बनणार आहे.

6 / 6
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. भारताने आठव्यांदा आशिया कप जिंकला आहे. आता वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कसोटी लागणार आहे.