Ruturaj Gaikwad Marriage Photo : ऋतुराज गायकवाडच्या लग्नाचे फोटो व्हायरल, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या चर्चा रंगली होती. अखेर चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
1 / 6
आयपीएल 2023 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ऋतुराज गायकवाड लग्नगाठीत अडकला आहे.
2 / 6
ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा महाबळेश्वरमध्ये विवाह पार पडला.
3 / 6
उत्कर्षा महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. 24 वर्षीय उत्कर्षा मध्यमगती गोलंदाज आहे. तिने 2021 मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळले आहे.
4 / 6
दोघेही आयपीएल फायनलमध्ये एकत्र दिसले होते. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षाने महेंद्रसिंग धोनीचे पाय स्पर्श करून आशीर्वादही घेतला होता.
5 / 6
वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला होता. ऋतुराज टीम इंडियाच्या राखीव यादीत होता.
6 / 6
ऋतुराजने स्वतः इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली आहे.