Heinrich Klaasen याची विस्फोटक खेळी, 13 सिक्स 13 फोर, 26 बॉलमध्ये 130 धावा
South Africa vs Australia, 4th ODI Heinrich Klaasen | हेनरिच क्लासेन याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडून काढला. हेनरिचने फक्त 26 बॉलमध्ये 130 धावांची सुस्साट खेळी केली.
1 / 5
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहेत. या मालिकेतील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हेनकिच क्लासेन याने इतिहास रचलाय.
2 / 5
हेनरिच क्लासेन याने या सामन्यात फक्त 26 बॉलमध्ये 130 धावा ठोकत धमाका केला आहे. क्लासेन याने या फटकेबाजीसह अनेक रेकॉर्ड केले आहेत.
3 / 5
हेनरिच क्लासेन याने फक्त 83 बॉलमध्ये 174 धावांची धुवादार खेळी केली. या दरम्यान त्याने 13 सिक्स आणि 13 फोर खेचले. म्हणजेच क्लासेन याने एकूण 174 पैकी 130 धावा या अवघ्या 26 बॉलमध्ये चौकार आणि षटकारांच्या मदतीने केले.
4 / 5
क्लासेन या खेळीसह दक्षिण आफ्रिकेकडून वनडेत एका डावात सर्वाधिक धावा करणारा आठवा बॅटसमन ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून एका वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा गॅरी क्रस्टन यांच्या नावावर आहे. गॅरी यांनी यूएई विरुद्ध 1996 साली 159 बॉलमध्ये नॉटआऊट 188* धावा केल्या होत्या.
5 / 5
दरम्यान हेनरिच याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 400 पार मजल मारली आहे. आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 416 धावा केल्या.