SA vs AUS : ॲडम जंपाने टाकलं वनडे क्रिकेटमधील सर्वात महागडा स्पेल, हेनरिक क्लासेननं फोड फोड फोडला
सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा वनडे सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 416 धावा केल्या. हेनरिक क्लासेननं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धु धु धुतलं. ॲडम जंपा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
1 / 6
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात षटकार आणि चौकारांचा वर्षाव झाला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 416 धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 417 धावांचं आव्हान दिलं.
2 / 6
ऑस्ट्रेलियाच्या ॲडम जंपा याने सर्वात महागडं षटक टाकलं. लेग स्पिनर ॲडम जंपा याने दहा षटकात 110 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाला नाही यासह ॲडम जंपा याच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
3 / 6
ॲडम जंपा हा वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियचाच्या मिक लुईसने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात महागडं षटक टाकलं होतं.
4 / 6
ॲडम जंपा एका डावात 100 हून अधिक धावा देणारा 16 गोलंदाज आहे. पण सर्वात महागडा षटक टाकण्याचा रेकॉर्ड ॲडम जंपा आणि मिक लुईस यांच्या नावावर आहे.
5 / 6
वहाब रियाज, राशिद खान, फिलिप बोइससेवेन, भुवनेश्वर कुमार, नुवान प्रदीप, मार्टिन स्नेडेन, टिम साऊदी, ब्रायन विटोरी, जेसन होल्डर, विनय कुमार, दौलत जादरान, हसन अली, अँड्र्यू टाय आणि जॅकब डफी यांनी हा नकोसा विक्रम केला आहे.
6 / 6
ॲडम जंपा ऑस्ट्रेलियाचा सर्वात महागडा फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम स्टीव्ह स्मिथ याच्या नावावर होता. स्मिथन 2010 मध्ये 9.5 षटकात 78 धावा देऊन 2 गडी बाद केले होते.