SA vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत क्विंटन डीकॉकचं तिसरं शतक, आता नोंदवला असा विक्रम
World Cup 2023, SA vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत क्विंटन डीकॉक जबरदस्त फॉर्मात आहे. स्पर्धेत तिसरं शतक झळकावलं आहे. या खेळीमुळे क्विंटन डीकॉक याने काही विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत क्विंटन डीकॉक याने तिसरं शतक ठोकलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा स्पर्धेतील पाचवा सामना आहे. पाच पैकी तीन सामन्यात क्विंटन डीकॉकने शतक ठोकलं आहे. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं आहे.
2 / 6
क्विंटन डीकॉक याने 101 चेंडूत 100 धावा केल्या. यासह एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा पहिला दक्षिण अफ्रिकन फलंदाज ठरला आहे.
3 / 6
दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना श्रीलंके विरुद्ध झाला. या सामन्यात डीकॉकने 84 चेंडूत 100 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 106 चेंडूत 109 धावा केल्या. नेदरलँड विरुद्ध 20 धावा करून बाद झाला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 4 धावा करून बाद झाला. आता पुन्हा एकदा बांगलादेश विरुद्ध शतक ठोकलं आहे.
4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेकडून खेळताना सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने चार शतकं ठोकली आहेत. तर तीन शतकांसह क्विंटन डीकॉक दुसऱ्या स्थानावर आहे. हर्शल गिब्स 2, हाशिम आमला 2 आणि फाफ डुप्लेसिसच्या नावावर 2 शतकं आहेत.
5 / 6
एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे. 2019 मध्ये रोहित शर्माने 5 शतक, 2015 मध्ये कुमार संगकाराने 4, 1996 मध्ये मार्क वॉने 3, 2003 मध्ये सौरव गांगुलीने 3, 2007 मध्ये मॅथ्यू हेडनने 3. 2019 मध्ये डेविड वॉर्नरने 3 आणि आता 2023 मध्ये क्विंटन डीकॉकने 3 शतकं झळकावली आहेत.
6 / 6
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीप), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स