महेंद्रसिंह धोनीच्या जागेवर हा खेळाडू सांभाळणार धुरा! आर. अश्विन म्हणाला..
IPL 2024 : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी खेळाडूची देवाणघेवाणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता मिनी ऑक्शन होणार आहे. त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. काही बातम्या अशा आहेत की? त्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे.
1 / 6
आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) नुकतीच आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केली होती. त्यानंतर संघांमध्ये बराच बदल झाल्याचं दिसून आलं आहे.
2 / 6
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आहे. कॅमरून ग्रीनला मुंबई इंडियन्समधून बंगळुरूत गेला आहे. या दरम्यान आता सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे.
3 / 6
संजू सॅमसनबाबत एक अफवा उडाली आहे. यात दावा केला आहे की, संजू चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळेल. तसेच महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी असणार आहे.
4 / 6
या सर्व अफवा ऐकून वाचून टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आर अश्विनने व्यक्त झाला आहे. अशा पद्धतीने बातम्या पसरवणाऱ्यांना आर अश्विनने खडे बोल सुनावले आहेत. एका ट्विटर युजरने दावा केला होती की, आर अश्विनने युट्यूब चॅनेवर संजू सॅमसनच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
5 / 6
आर. अश्विनने या दाव्यावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ही फेक न्यूज आहे आणि माझ्या नावावर अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नयेत.
6 / 6
संजू सॅमसन गेल्या काही सिझनपासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे. तसेच त्याच्याकडे कर्णधारपद आहे. दुसरीकडे, एमएस धोनीचं आयपीएलचं हे शेवटचं पर्व असणार आहे.