यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात होणार आहे. मात्र पाकिस्तान संघ भारतामध्ये येणार की नाही याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही. मात्र याबाबत बोलताना माजी कर्णधार आफ्रिदीने आताच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये जाऊन जिंकून यावं, असं म्हटलं आहे.
शाहिद आफ्रिदीने एक किस्सा सांगितला ज्यामध्ये ते भारतात दौऱ्यावर आले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या पाकिस्तान संघ भारतामध्ये क्रिकेट खेळायला येणार की नाही याबाबत अजुनही सर्व काही तळ्यात मळ्यात आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये आफ्रिदी बोलत होता.
2005 मधील बंगळुरूमधील कसोटीमधे विजय मिळवला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी आमच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती, असं आफ्रिदीने सांगितलं.
माझं वैयक्तिक मत आहे, पाकिस्तान संघाने भारतामध्ये जावून वर्ल्ड कप खेळावा आणि जिंकूव यावं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.