टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन क्रिकेटपासून दूर आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम इंडियात नाही. ईशानने मानिसक आरोग्याचा दाखला देत माघार घेतली.
ईशान किशन तेव्हापासून एकही सामना खेळलेला नाही. त्याला रणजी ट्रॉफीत आपल्या राज्यासाठी खेळण्याबाबत बीसीसीआयने आदेश दिले. ईशान त्यालाही जुमानला नाही. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ईशान किशन याला चोरी करताना रंगेहाथ पकडलं गेलं. ईशानला टेलिफोन चोरीमध्ये तो रंगेहाथ पकडला गेला. रोहित शर्माने याबाबत उलगडा केला.
मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बाँड होते. त्यांनी ईशानसोबत हा प्रँक केला होा.दोघांनी ईशानसोबत ही मस्ती केली होती. ईशानच्या बॅगेत हॉटेलमधील टेलिफोन भरले होते. त्यानंतर चेक आऊट करताना ईशानला सेक्युरिटीने रोखलं.
"शेन बाँड आणि ट्रेनर पॉल चॅपमन या दोघांनी ईशानच्या बॅगेत हॉटेलमधील टेलिफोन टाकले होते. त्यानंतर चेक आऊट करताना ईशानला सेक्युरिटीने रोखलं आणि विचारलं टेलिफोन कुठे घेऊन जातोय? चोरी करतोय का?",इशानसोबत प्रँक केल्याचा किस्सा रोहितने सांगितला.
बॅगेत टेलिफोन सापडल्याने ईशान गांगरला. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, तर मी टेलिफोन का घेऊन जाऊ? असा प्रतिप्रश्न ईशानने सेक्युरिटी गार्डला केल्याचंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.
ईशानला घाबरवण्यासाठी चॅपमॅन आणि बाँड या दोघांनी सेक्युरिटीला या प्रँकबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे या प्रँकमध्ये ईशान किशन चांगलाच अडकला, असंही रोहितने सांगितलं.