मुंबईने तामिळनाडूवर तिसऱ्याच दिवशी 70 धावा आणि एका डावाने विजय मिळवला. मुंबईने या विजयासह रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने ही कामगिरी केली. तर अष्टपैलू शार्दूल ठाकुर विजयाचा शिल्पकार ठरला.
शार्दूल ठाकुर याने या सामन्यात बॉलिंग आणि बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली. शार्दूलने एका अर्थाने मुंबईसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली.
शार्दूलने 109 धावांची शतकी खेळी केली. शार्दुलचं हे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलं.
शार्दुलने दोन्ही डावात मिळून एकूण 4 विकेट्स घेतल्या. शार्दूलने दोन्ही डावात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
शार्दूलने केलेल्या या कामगिरीची दखल घेत त्याचा सन्मान करण्यात आला. शार्दूलला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.