पाकिस्तान क्रिकेट टीमचा युवा फलंदाज सऊद शकील याने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी डबल सेंच्युरी ठोकत इतिहास रचला आहे.
सऊद शकीलने 352 बॉलमध्ये हे द्विशतक पूर्ण केलं. शकील यासह श्रीलंकेत द्विशतक करणारा पहिलाच पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे.
सऊदच्या कसोटी कारकीर्दीतील पहिलीवहिली डबल सेंच्युरी आहे.
तसेच सऊद पाकिस्तानकडून कसोटीत द्विशतक करणारा एकूण 23 वा फलंदाज ठरला आहे.
सऊद शकील याने 361 बॉलमध्ये 19 चौकारांच्या मदतीने नाबाद 208 धावा केल्या. सऊदच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 312 धावांच्या प्रत्युत्तरात पाकने 461 धावांपर्यंत मजल मारली. पाकने यासह 149 धावांची आघाडी घेतली. तर श्रीलंकेने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 14 धावा केल्यात.