SL vs SA : 18 डॉट बॉल, 4 विकेट…! ॲनरिक नॉर्ट्जेचा वर्ल्डकपमध्ये विश्वविक्रम

| Updated on: Jun 04, 2024 | 9:49 PM

T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने टी20 विश्वचषकात श्रीलंकेचा दारूण पराभव केला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 77 धावांत गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना 16.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेने 6 गडी राखून विजय मिळवला.

1 / 6
आयपीएलमध्ये प्रति षटक 13.36 धावा देणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्ट्जे वर्ल्डकपमध्ये मात्र चमकला. भेदक गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले आहे. तसेच पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम नोंदवला आहे.

2 / 6
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवरट टी20 विश्वचषकाच्या तिसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या सामन्यात अॅनरिक नॉर्ट्जेने 4 षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले.

3 / 6
अॅनरिक नॉर्ट्जेने चार विकेट्ससह टी20 विश्वचषकात अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. टी20 विश्वचषकात अवघ्या 7 धावांत 4 बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे याआधी हा रेकॉर्ड अॅनरिक नॉर्ट्जेच्या नावावर होता. त्याने 2021 मध्ये 10 धावा आणि 4 विकेट घेतले होते.

4 / 6
अॅनरिक नॉर्ट्जेने 4 विकेट्ससह तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाजही ठरला आहे. याआधी केवळ मॉर्नी मॉर्केल आणि मुस्तफिजुर रहमान आणि उमर गुल यांनी तीनवेळा 4 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता अॅनरिक नॉर्ट्जेने चौथ्यांदा 4 बळी घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

5 / 6
अॅनरिक नॉर्ट्जे टी20 विश्वचषकात 4 षटकात सर्वात कमी धावा देणारा गोलंदाजही ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या अजंता मेंडिस, वनिंदू हसरंगा आणि बांगलादेशच्या महमुदुल्लाह यांनी 4 षटकांत 8 धावा देत हा विक्रम नावावर केला होता.

6 / 6
अॅनरिक नॉर्ट्जेने 4 षटकात 18 डॉट बॉल टाकून फक्त 7 धावा दिल्या आहेत. 18 डॉट बॉल टाकत 4 विकेट घेत टी20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे.