वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेची धडक, दुसरा संघ भारत की ऑस्ट्रेलिया?

| Updated on: Dec 30, 2024 | 9:36 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने धडक मारली आहे. पाकिस्तानला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेने आपलं तिकीट पक्कं केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामन्यात या अंतिम फेरीबाबत काय ते ठरणार आहे.

1 / 6
मेलबर्न कसोटी सामना जवळपास भारताच्या हातातून निसटला आहे. ऑस्ट्रेलिायने विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं आहे. पण हे आव्हान गाठताना दिग्गज खेळाडू गारद झाले आहेत. त्यामुळे सामना ड्रॉ करण्यासाठी केविळवाणा प्रयत्न सुरु आहे.

2 / 6
चौथा कसोटी सामना भारताने गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा मार्ग खडतर होईल. कारण भारताने हा सामना गमवल्यास विजयी टक्केवारी 52.57 टक्क्यांवर घसरेल. तर ऑस्ट्रेलियाचे 61.45 टक्के गुण होतील.

3 / 6
टीम इंडियाने चौथा सामना गमवला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीच्या आशा जिवंत राहतील. पण सिडनी कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंतिम फेरीचं भवितव्य श्रीलंकेच्या हाती असेल.

4 / 6
टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने संपतील. मात्र ऑस्ट्रेलियन संघाला श्रीलंकेविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया मेलबर्न टेस्ट हरली तर श्रीलंका टीमचा निकाल निर्णायक असेल.

5 / 6
मेलबर्नमध्ये हरल्यास आणि सिडनी कसोटी जिंकल्यास भारताला 55.26% गुण मिळतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे गुण 57.84% असतील. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध मालिका 0-1 ने गमावली तर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 53.50 टक्क्यांपर्यंत घसरेल. याद्वारे 55.26 टक्के गुणांसह टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करू शकते.

6 / 6
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया 57.01 विजयी टक्क्यांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलिया संघ 57 ट्क्के गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.