आशिया कप स्पर्धेत भारताला पराभूत करत श्रीलंकेने रचला असा इतिहास, काय ते जाणून घ्या

| Updated on: Jul 28, 2024 | 9:15 PM

आशिया कप 2024 स्पर्धेचं जेतेपद जिंकून श्रीलंकन महिला संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1 / 5
वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं  आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

2 / 5
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

3 / 5
महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

4 / 5
महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

5 / 5
महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.