World Cup 2023 : श्रीलंकेच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, वर्ल्डकप विजेत्या संघांची दयनीय स्थिती
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत श्रीलंकेची स्थिती एकदमच दयनीय झाली आहे. तीन पैकी तीन सामने गमवल्याने उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. त्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केला. श्रीलंकेने सर्वबाद 209 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 5 गडी राखून पूर्ण केलं.
2 / 6
श्रीलंकेचा वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित पूर्णत: फिस्कटलं आहे. अजून दोन सामने गमावले तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता पुढील सर्व सामने जिंकण्याचं श्रीलंकेसमोर आव्हान असणार आहे.
3 / 6
वनडे वर्ल्डकप 1996 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत एकही सामना श्रीलंकेला जिंकता आला नाही. आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
4 / 6
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत करताच श्रीलंकेच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा पराभूत होणारा संघ म्हणून नकोसा मान मिळाला आहे.
5 / 6
श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी 42-42 सामन्यात पराभव मिळाला आहे. दोन्ही संघ संयुक्तिकरित्या पहिल्या स्थानावर आहेत. पण आणखी पराभव होताच श्रीलंका झिम्बाब्वेला मागे टाकेल.
6 / 6
35 सामन्यात पराभवासह वेस्ट इंडिज तिसऱ्या आणि 34 सामन्यात पराभवासह इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड हा एकमेव संघ असा आहे. सर्व टेस्ट खेळणाऱ्या संघांकडून पराभूत झाला आहे. अफगाणिस्ताने 69 धावांनी पराभूत करत मोठा उलटफेर केला होता. (सर्व फोटो : ट्विटर)