Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेपूर्वी संघाला मोठा धक्का, कोरोना आणि दुखपतीमुळे अडचण वाढली

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक खेळाडू गंभीर जखमी झाला आहे.

| Updated on: Aug 26, 2023 | 9:51 PM
30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेपूर्वी श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता श्रीलंकन संघाचे दोन खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

1 / 6
श्रीलंकन संघाचा  वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आणि फिरकीपटू वनिंदू हसरंगा दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे. दुष्मंथा चमीरा स्पर्धेबाहेर होणार असून हसरंगा सुरुवातीच्या सामन्यांसाठी अनुपलब्ध राहणार असल्याचे वृत्त आहे.

2 / 6
लंका प्रीमियर लीग स्पर्धेत हसरंगाने चमकदार कामगिरी केली आहे. तसेच, त्यांच्या नेतृत्वाखालील बी-लव्ह कँडी संघाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हसरंगाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

3 / 6
लंका प्रीमियर लीगदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या चमीराने जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सहा विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. आता या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे.

4 / 6
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, श्रीलंका संघाचे व्यवस्थापक महिंदा हलंगोडा यांनी सांगितलं आहे की, हसरंगा बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या गट-टप्प्याच्या सामन्यात खेळणार नाही. तर चमीरा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

5 / 6
दुसरीकडे, श्रीलंकन संघाचे प्रमुख फलंदाज परेरा आणि फर्नांडो या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी हे दोघे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. या दोघांची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पुन्हा चाचणी घेतली जाईल.

6 / 6
Follow us
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.