IPL 2024 स्पर्धेत सुरेश रैनाचं कमबॅक! लखनऊ सुपर जायंट्सने लावली अशी फिल्डिंग
सुरेश रैना याची याला मिस्टर आयपीएल म्हणून संबोधलं जातं. सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. आयपीएल 205 सामने खेळत रैनाने एक शतक आणि 39 अर्धशतकांच्या मदतीने 5528 धावा केल्या आहेत. आता सुरेश रैना 2024 स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवताना दिसणार आहे.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत बिगुल वाजलं आहे. त्यासाठी मिनी लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात कोट्यवधी रुपयांची उधळण करत खेळाडूंची खरेदी झाली आहे. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.
2 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वात सुरेश रैना नव्या अध्यायाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्ससाठी सुरेश रैना डगआऊटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण खेळाडू नाही तर एक मेंटॉरच्या भूमिकेत असणार आहे.
3 / 6
आयपीएल 2021 नंतर सुरेश रैनाने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आता आयपीएल 2024 स्पर्धेत सुरेश रैना लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
4 / 6
आयपीएल 2022 आणि 2023 स्पर्धेत गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्ससाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. पण कोलकाता नाइट रायडर्सने मोठी भूमिका दिल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे सुरेश रैना या पदावर दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
5 / 6
सुरेश रैनाला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. कार बीसीसीआयने त्याला एनओसी दिली असून तो इतर लीगमध्ये खेळताना दिसला आहे. बीसीसीआय नियमानुसार इतर लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीयांना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही.
6 / 6
सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. त्याने 205 सामने खेळले असून एक शतक आणि 39 अर्धशतकांच्या मदतीने 5528 धावा केल्या आहेत.