आयपीएलमध्ये एकाही टीमने संधी दिली नाही त्या युवा फलंदाजाने टी 20 ब्लास्ट स्पर्धेत धमाका केलाय. हा फलंदाज नुकत्याच पार पडलेल्या टी 20 ब्लास्ट स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या जेम्स विन्स याने हॅम्पशायर टीमकडून खेळताना 16 सामन्यांम्ध्ये 670 धावा केल्या. या खेळी दरम्यान विन्स याने 1 शतक आणि 7 अर्धशतक ठोकले. मात्र एसेक्सने हॅम्पशायरचा सेमी फायनलमध्ये पराभव केला.
विन्सने आतापर्यंत अनेक लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र त्याला अजून आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. विन्स आयपीएल 2022 मध्ये अनसोल्ड राहिला.
विन्स विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. विन्स याने इंग्लंडचं 17 टी 20 सामन्यांमध्ये 128.25 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्या आहेत. तसेच विन्सने 25 वनडे आणि 13 कसोटी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलंय.
समरसेट क्रिकेट टीम टी 20 ब्लास्ट 2023 चॅम्पियन ठरली. समरसेटने फायनलमध्ये एसेक्सचा पराभव केला. समरसेटने दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना एसेक्स 131 धावांवर ऑलआऊट झाली.